Home » पाकवर हल्ला करा, मी सोबत आहे : तोगडिया

पाकवर हल्ला करा, मी सोबत आहे : तोगडिया

डॉ. प्रवीण तोगडिया यांचे सरसंघचालकांना आव्हान

by Navswaraj
0 comment

नागपूर : अखंड भारत निर्माण करायचा असेल, तर पाकिस्तानवर हल्ला करावाच लागेल. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाकवर हल्ल्यासाठी पुढाकार घ्यावा, मी सोबत असेल असे अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख डॉ. प्रविण तोगडिया नागपुराम म्हणाले.

नागपुरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी डॉ. तोगडिया यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, डॉ. मोहन भागवत म्हणतात, १५ वर्ंषात अखंड भारत निर्माण करायचा आहे. आता केंद्रात त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे बोलत बसण्याण्यापेक्षा संघाने व केंद्र सरकारने करून दाखवावे. अखंड भारतासाठी पहिले पाऊल म्हणून त्यांनी काश्मीर घाटीत हिंदुंना पुन्हा वास्तव्यास न्यावे. एक रात्र डॉ. भागवत यांनी स्वत: तिथे काढावी, मी त्यांच्या सोबत असेल. संघाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये संघाची शाखा लावावी. आपण त्या शाखेत जाऊ. पाकिस्तानवर हल्ला करावा. ज्या टँकवर डॉ. भागवत बसतील, त्यांचा टँक ज्या मार्गाने जाईल तो रस्ता आपण स्वच्छ करू.

हे ही वाचा : हिंदुराष्ट्र हवे असेल तर जास्तीत जास्त मुलांना जन्म द्या : महंत नरसिंहानंद

http://navswaraj.com/2022/04/19/hindus-should-increase-there-population-by-increasing-birth-rate-says-narsihanand/

गुजरात, मध्य प्रदेशात दंगे होतात, हे गुप्तचर विभागाला माहित होत नाही, हे सरकारचे अपयश आहे. देशात जिहादींची हिम्मत वाढली आहे. त्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घालण्याची गरज आहे. भाजपने मेहबुबा मुक्ती सोबत सत्ता वाटली. त्यावेळी कोणी अशी चर्चा केली नाही की, भाजपने हिंदुत्व सोडले. त्यामुळे जे शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात त्यांनी भाजपला विचारावे, ज्या व्ही. पी सिंग यांनी हिंदूंवर गोळ्या झाडल्या, त्याच्यासोबत भाजप गेली होती. परिणामी आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे, असा सल्ला तोगडिया यांनी दिला.

error: Content is protected !!