Home » अकोल्याच्या पातूरमध्ये कुऱ्हाडीचे घाव घालत पतीने पत्नीला संपविले

अकोल्याच्या पातूरमध्ये कुऱ्हाडीचे घाव घालत पतीने पत्नीला संपविले

by नवस्वराज
0 comment

अकोला : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर (राम नगर) मध्ये दारुड्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. गोपीचंद राजाराम चव्हाण हे आरोपीचे नाव आहे. संगीता गोपीचंद चव्हाण हे मृतक महिलेचे नाव आहे.

गोपीचंद आणि संगीताचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. गोपीचंदला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघांच्यामध्ये वाद होत असतं. नेहमी दारू पिऊन गोपीचंद हा संगीताला मारहाण करायचा. तिने पातूर पोलीस ठाण्यात गोपीचंद विरोधात तीन वेळा तक्रारीसुद्धा दिली होती. शेवटी संगीताचे गावातच माहेर असल्याने ती आपल्या अर्जुन आणि अंशुमन या दोन मुलांसह माहेरी राहत होती. 12 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गोपीचंद पहाटे झोपेतून उठला आणि कुऱ्हाडीने संगीताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर घाव घालून संगीताची क्रूरपणे हत्या केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!