Home » वारी येथील श्री हनुमान सागरमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

वारी येथील श्री हनुमान सागरमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

by Navswaraj
0 comment

अकोला : हिवरखेड नजीकचा आणि अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला वारी हनुमान येथील वान प्रकल्पाची पाणी पातळी ९५ टक्के झाली आहे. प्रकल्पाने निर्धारित पाणी साठवण क्षमता गाठली आहे.

वान प्रकल्प पाणी पातळी ४११.१९ मीटर असून, ९५.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये सप्टेंबरअखेर ९५.२४ टक्के पाणी साठा असणे निर्धारित आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून, धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या येव्या नुसार कोणत्याही क्षणी वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे, असे आवाहन वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!