Home » बुलडाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला

बुलडाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : सिंदखेडराजामध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली. हा पेपर सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

बारावीचा गणिताचा पेपर कोणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कोणाचा हात आहे? यामागे कोणते रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास सध्या केला जात आहे. यानंतर विधानसभेत पेपर फुटीचे पडसाद उमटले आहेत. यावेळी अजित पवार यांनी सरकार काय करत आहे? सरकार झोपले का? असा सवाल उपस्थित केला. मात्र, बोर्डाकडून पेपर फुटीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते.  इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!