Home » अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह, डीआयजी मीना यांच्यासह अनेकांच्या बदली

अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह, डीआयजी मीना यांच्यासह अनेकांच्या बदली

by Navswaraj
0 comment

अकोला : पोलीस दलातील उपमहानिरीक्षक, महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवार 14 डिसेंबर 2022 रोजी जारी करण्यात आले. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने केले आहे.

नागपूर शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे अमरावती शहराचे नवे पोलीस आयुक्त असतील. मीना यांच्या जागेवर अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून मुंबई येथुन जयंत नाईकनवरे यांना नियुक्त करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 31 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वेगवेगळ्या आदेशांच्या माध्यमातून करण्यात आल्या.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यात चांगलाच वाद होता. सिंह यांची बदली व्हावी यासाठी आमदार रवी राणा अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. गणेशोत्सवानंतर त्यांची बदली होईल, अशी घोषणाही आमदार राणा करून मोकळे झाले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आटोपली तरी सिंह यांची बदली होत नसल्याने आमदार राणा अस्वस्थ होते. अशात बुधवारी गृह मंत्रालयाने अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने त्यात आरती सिंह यांचाही क्रमांक लागला. ही बदली सर्वसाधारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!