Home » अकोल्यातील पोळा चौकात आढळल्या ऐतिहासिक वस्तू

अकोल्यातील पोळा चौकात आढळल्या ऐतिहासिक वस्तू

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यातील जुने शहर भागात असलेल्या पोळा चौकात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान ऐतिहासिक वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. खोदकाम सुरू असताना येथे सोन्याचे हंडे सापडल्याची अफवा जोरावर होती.

पोळा चौकात असलेल्या बैलजोडी जवळ नालीचे बांधकाम सुरू असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास ऐतिहासिक वस्तू आढळल्या. त्यानंतर या भागामध्ये खोदकामात सोने आढळल्याची अफवा पसरली. सोन्याचे हंडे पाहण्यासाठी पोळा चौकात नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोळा चौक परिसर गाठला. खोदकामादरम्यान सापडलेल्या ऐतिहासिक वस्तूताब्यात घेण्यात आल्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!