Home » श्री विठ्ठल मंदिरात दान केलेल्या खोट्या दागिन्यांच्या प्रकरणी सखोल पोलीस चौकशी करा !

श्री विठ्ठल मंदिरात दान केलेल्या खोट्या दागिन्यांच्या प्रकरणी सखोल पोलीस चौकशी करा !

by Navswaraj
0 comment

अकोला : सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा ‘क्लीन चीट’ दिलेली असतांना ‘बीबीसी न्यूज’ने ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट बनवला. याद्वारे मोदी यांना गुजरात दंगलीसाठी दोषी ठरवून भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जागतिकस्तरावर जाणीवपूर्वक मलीन केली आहे. याप्रकरणी ‘बीबीसी न्यूज’वर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र जागृती तर्फे निवेदनाच्या माध्यमातून अकोला येथे करण्यात आली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या शिल्पा बोबडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीच्या अधिवक्ता श्रुती भट, डॉक्टर अशोक ओळंबे (महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी सदस्य), प्रा. हरिदास ठाकरे (श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान अकोला व वाशिम जिल्हा अध्यक्ष), संजय ठाकूर (महाराणा प्रताप सेवा समिती अकोला जिल्हा अध्यक्ष), सुनील अग्रवाल (सामाजिक कार्यकर्ते), प्रेमनाथ शर्मा (धर्मप्रेमी), अजय खोत (सनातन संस्था) आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

याशिवाय नुकतेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दान केलेले पोते भरून  दागिने खोटे  मिळाल्याचे मंदिरातील अधिकार्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात सरकारी मंदिर व्यवस्थापन समितीने काही भाविक मुद्दाम असे खोटे दागिने अर्पण करत असल्याचे कारण दिले आहे. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वतःचे हात झटकले आहेत. सरकारी मंदिर व्यवस्थापन समितीच्या पूर्वीच्या गैरव्यवहारांच्या अनुभवावरून या प्रकरणात मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने सखोल पोलीस चौकशी करावी, तसेच सर्व मोठ्या मंदिरांमध्ये दान करण्यात येणाऱ्या दागिन्यांची सत्यता पडताळणारी आणि त्यांची योग्य प्रकारे नोंदणी करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!