Home » छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध

by नवस्वराज
0 comment

अकोला : महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्यातील मंदिरात दर्शनाला येताना फाटलेली जीन्स, स्कर्ट, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून प्रवेश करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्यानंतर हिंदू जनजागृती समितीने भुजबळ यांचा निषेध व्यक्त केला आहे.

हिंदू संस्कृतीस अनुसरून सोज्वळ वस्त्र परिधान करावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करताना हा निर्णय मूर्खपणा असल्याचे म्हटले. भुजबळ यांच्या या वक्तव्याचा हिंदू जनजागृती समितीने तीव्र निषेध केला आहे.

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात मंत्री असताना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचार्यांनी जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, भडक रंगाचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, स्लीपर वापरता येणार नाही, अशी वस्त्रसंहिता भुजबळांनी लागू केली होती. मात्र मंदिरात संस्कृतीप्रधान वस्त्र घालून येण्याचे आवाहन यांना चालत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. मंदिरात दर्शनासाठी येतांना शोभनीय आणि सात्त्विक वस्त्र घालण्याच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये राजकारण्यांनी लुडबूड करू नये, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!