Home » नागपूर हायकोर्टाने विचारले, ‘ती’ आरोपी कशी होऊ शकते?

नागपूर हायकोर्टाने विचारले, ‘ती’ आरोपी कशी होऊ शकते?

by Navswaraj
0 comment

नागपूर : प्रेयसीने नाते तोडले म्हणजे तिने आत्महत्येला प्रवृत्त केले असे होत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलडाण्यातील एका प्रकरणात दिला.

प्रेयसीने प्रियकराशी नात तोडून दुसरे लग्न केले. या विरहातून प्रियकराने आत्महत्या केली, म्हणून त्यासाठी प्रेयसीला दोषी ठरवता येत नाही असे म्हणत बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रेयसीवर दाखल असलेला गुन्हा रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे आणि गोविंद सानप यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

मनीषा (बदलले नाव) नामक तरुणीसोबत जीवनचे विवाहबाह्य संबंध होते. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नव्हता. दोघांत बरेच दिवस प्रेमसंबध होते. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. पण पत्नीसोबत घटस्फोट घेऊन मनीषासोबत लग्न करण्यास त्याने असमर्थ दाखवली. मनीषाने सुद्धा जीवनशी लग्न करण्यासाठी समजूत घातली. पण मनीषाला यश आले नाही. त्यामुळे तिने जीवनसोबत असलेले नातेसंबंध तोडून विवाह करण्याचा पर्याय निवडला.

तिने दुसरा विवाह केल्यानंतर अगोदरच पत्नीपासून दूर झाल्याने नैराश्यात गेलेल्या जीवनने आत्महत्या केली. यात जीवनच्या आईने ७ मे २०२१ रोजी पोलिसात तक्रार दिल्याने मनिषावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मनीषाने आपल्यावर अन्याय झाला असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मान्य केली. यात आईने केलेला आरोपावर न्यायालयाने सुनावणी घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले.

निरीक्षण नोंदवतात जरी दोघांत प्रेम असले तरी जीवन हा पत्नीपासून दूर झाल्याने अगोदरच नैराश्यात होता. यात जरी मनीषाने विवाह केला तर त्यासाठी मनीषा दोषी ठरत नाही. मानिषाने जीवन सोबत लग्न करण्यास तयारी दर्शवली होती. पण जीवनने पत्नीपासून घटस्फोट घेतला नाही. त्यामुळे मनीषाने दुसऱ्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मनीषाने जीवनने आत्महत्या करावी असा कुठलाही कट रचला नाही. त्यामुळे मनीषाने आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मनिषावर अन्याय होऊ नये यासाठी दाखल एफआयआर रद्द करण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने केला आहे.

error: Content is protected !!