Home » इस्राइलच्या भूमीवर लढणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीला वीरमरण

इस्राइलच्या भूमीवर लढणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीला वीरमरण

by Navswaraj
0 comment

तेल अविव : इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन भारतीय वंशाच्या महिला सैनिक शहीद झाल्या आहेत. त्यातील एक महाराष्ट्राची लेक आहे. लेफ्टनंट ऑर मोजेस (२२) आणि इन्स्पेक्टर किम डोक्राकर अशी या हमासच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वंशाच्या महिला सैनिकांची नावं आहेत. ऑर मोजेस होम फ्रंट कमांडमध्ये कार्यरत होती, तर किम डोक्राकर सीमा पोलीस दलात तैनात होती. शहाफचे आजोबा याकोव टॉकर हे १९६३ साली मुंबईहून इस्रायलला गेले होते. या युद्धात इस्रायलचे २८६ सैनिक आणि ५१ पोलीस शहीद झाले आहेत. इस्रायली नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. यापैकी बहुसंख्य ओलिसांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यात भारतीय वंशाचे लोक असण्याची देखील शक्यता आहे. भारतीय वंशाची महिला शहाफ टॉकर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात थोडक्यात वाचली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!