Home » Weather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी मेघगर्जना

Weather Update : पुढील तीन दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी मेघगर्जना

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला इशारा

by नवस्वराज
0 comment

Nagpur : संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस विजा आणि गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज खात्याने व्यक्त केला आहे. येत्या 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. 25 फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.

काही दिवसा अगोदरच म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपिट झाली होती. त्यामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होत असताना पुनः राज्यात मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे, यामध्ये 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोबतच या ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा वर्तविण्यात आली आहे.  नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यात 25 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

देशात हवामानाची परिस्थिती

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत हवामान बदलणार आहे. पाऊस आणि गारपिटीसह जोरदार वारेही वाहणार असून त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येणार आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. उत्तर भारतातील काही भागात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर तसेच लडाख, गिलगीट या भागांमध्ये मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!