Home » राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरोग्य सेवा प्रकल्प.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरोग्य सेवा प्रकल्प.

by Navswaraj
0 comment

अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला महानगर अंतर्गत दर रविवारी सकाळी ८ ते १० या दरम्यान जेतवननगर खदान येथील बुद्ध विहारात आरोग्य विषयक सेवा देण्यात येते. शंभरवर रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी देण्यात येतात.

या प्रकल्पात डॉक्टर सुनील गिरणीकर, डॉक्टर रवीप्रकाश ठाकूर , डॉक्टर प्रमोद श्रावगी, डाॅक्टर अशोक ओळंबे, डाॅक्टर शुभम बाणेरकर निशुल्क सेवा देतात. प्रकल्पासाठी मकरंद देशपांडे अकोला महानगर सेवाप्रमुख, श्याम कुलकर्णी गोरक्षण नगर सेवाप्रमुख, विलास जोशी, सिद्धार्थ ऊपरवट, प्रीतम ठाकूर, सचिन मुलेमुले सहकार्य करतात. प्रकल्पास गौरक्षण कार्यवाह यांच्यासह झुलेलाल शाखा सिंधी कॅम्पच्या स्वयंसेवकांनी भेट देऊन सहकार्य करण्याचे एकमताने ठरवले आहे.

error: Content is protected !!