Home » सोशल मीडिया सरकारची इन्फ्लुएन्सर्ससाठी नियमावली

सोशल मीडिया सरकारची इन्फ्लुएन्सर्ससाठी नियमावली

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.

फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाची व्याप्ती जसजशी वाढत आहे तसतसे सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका वाढला आहे. इन्फ्लुएन्सर्सने अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचे समर्थन करु नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलेले नाही किंवा त्यांनी ते वैयक्तिकरित्या वापरलेले नाही. सरकारची ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लाईव्ह स्ट्रिमिंगलाही लागू होणार आहेत. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमद्वारे सेलिब्रेटी किंवा प्रभावशाली व्यक्ती उत्पादनाची जाहिरात करत असतील, तर त्यातही त्यांना त्या उत्पादनाची योग्य माहिती द्यावी लागेल.

असे आहेत नियम

  1. पैसे घेऊन ब्रॅंडला प्रमोट केले तर त्याची माहिती द्यावी लागणार. असे व्हिडीओवर लिहावे लागेल.
  2. संबंधित कंपनीकडून मिळालेल्या पैशांची माहिती द्यावी लागेल.
  3. नियमांचे उल्लंघन केलं तर 10 ते 15 लाख रुपयांचा दंड.
  4. प्रोडक्टची स्तुती देखील जाहिरातीचाच भाग असेल.
  5. वारंवार दोषी आढळल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार
  6. अकाऊंट देखील सस्पेंड केले जाणार किंवा एन्डोर्समेंटवर बंदी.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!