Home » ‘रूद्र सप्तशती मंडळा’ तर्फे वनवासी कल्याण आश्रमाला कृतज्ञता निधी

‘रूद्र सप्तशती मंडळा’ तर्फे वनवासी कल्याण आश्रमाला कृतज्ञता निधी

by Navswaraj
0 comment

अकोला : जठारपेठ परिसरातील रूद्र सप्तशती मंडळातर्फे अकोट येथील वनवासी कल्याण आश्रमाला दहा हजार एक रुपये कृतज्ञता निधी देण्यात आला. सप्तशती मंडळाचे सुधाकरराव जकाते, मनोहर लऊळ, रघुनाथ आयाचित, रघुनाथ बिडकर, प्रेमानंद पाचपोर, विनायक आयाचित, किशोर देशकर यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे संघटनमंत्री पांडूरंग पिंपरी यांना राशी दिली. याप्रसंगी सुंदरलाल बेडेकर, बिंदू पिंपरे, वामन जकाते उपस्थित होते.

वनवासी कल्याण आश्रमात मेळघाट परिसरातील तांड्यातील कोरकू, भिल्ल, कोलाम, भिलाला समाजातील होतकरू मुलांना नि:शुल्क निवास, भोजन व शिक्षण देण्यात येते. सुधाकर जकाते आणि सुरेश आयाचित यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!