Home » अ.भा. ग्राहक पंचायतची राष्ट्रीय साधारण सभा उत्साहात

अ.भा. ग्राहक पंचायतची राष्ट्रीय साधारण सभा उत्साहात

by नवस्वराज
0 comment

अकोला : अखिल भारतीय ग्राहक पंचायतची दोन दिवसीय राष्ट्रीय साधारण सभा १५-१६ एप्रिल रोजी नारायण भाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष, दिनकर सबनीस राष्ट्रीय संघटनमंत्री, अरुण देशपांडे राष्ट्रीय सचिव, जयंतभाई कथीरीया, राष्ट्रीय सहसचिव यांचे प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील रतलाम येथे उत्साहात संपन्न झाली.

दररोज सात सत्रात सभेचे कामकाज करण्यात आले. सभेमध्ये ग्राहक पंचायतचा विस्तार, राबवायचे कार्यक्रम, उपक्रम, ग्राहकांच्या समस्या, ग्राहक पंचायतच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत; त्या अनुषंगाने सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम सप्टेंबर २०२३ पासून राबविणे आदी विषयांवर विस्ताराने मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. विक्रीसाठी असलेल्या सर्व वस्तूंच्या वेष्टणावर कमाल किरकोळ किंमत (एमआरपी ) ऐवजी , निर्मिती व विक्री मूल्य नमूद करावे, खाद्य तेलात होत असलेल्या भेसळीवर नियंत्रण ठेवावे तसेच हरित उर्जेच्या वापराला विशेष प्राधान्य देण्यात यावे असा ठराव एकमताने सभेत संमत झाला. शासनाला लवकरच तसा प्रस्ताव सादर केला जाईल. सभेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य तसेच देशाच्या ३६ प्रांतातील पदाधिकारी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!