Home » राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोश्यारी कोरोनाची लागण झाल्याने तात्पुरता कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्याबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गटासाठी 37 संख्या हवी आहे. परंतु, 40 आमदार असल्याचा दावा शिंदे करीत आहेत. आवश्यक मतांचा कोटा शिंदे यांनी पूर्ण केल्यास स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र राजभवनला लवकरच दिले जाण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्यपालांनाच कोरोना झाल्याने आता त्यांना गोव्याच्या राज्यपालांकडे पत्र द्यावे लागणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!