Home » राज्यपाल पदावर असताना संघ मुख्यालयात जातात तेव्हा…

राज्यपाल पदावर असताना संघ मुख्यालयात जातात तेव्हा…

by Navswaraj
0 comment

नागपूर : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पहिल्यांदाच नागपुरातील संघाच्या मुख्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे आरिफ मोहम्मद हे पदावर असताना संघ मुख्यालयाला भेट देणारे  बहुधा पहिलेच राज्यपाल असावेत.

आरिफ मोहम्मद खान हे सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले होते. त्यानंतर मंगळवार, १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रवासात असल्यामुळे त्यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नागपुरात नाहीत. इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ते परतले. ते स्वेच्छेने भेट देण्यासाठी गेले होते. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. अशा पदावर असताना कोणतेही व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्ष किंवा तत्सम संघटनांच्या कार्यालयाला भेट देणे, त्यांच्या सभा, समारंभात सहभागी होणे टाळतात. अशात पदावर असताना संघ मुख्यालयाला भेट देणारे आरिफ बहुधा पहिलेच राज्यपाल आहेत. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!