Home » गुगल शोधणार मुंबईतील बेवारस वाहने

गुगल शोधणार मुंबईतील बेवारस वाहने

by admin
0 comment

मुंबई: मुंबई महापालिका आता गुगल या जगविख्यात कंपनीची मदत घेणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या करण्यात येत असलेल्या बेवारस वाहनांचा शोध त्यातून घेण्यात येणार आहे.

अरुंद रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा अवैध पार्किंग यामुळे मुंबईत नेहमीच वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून बेवारस वाहने उचलून ती विभाग स्तरावरील गोदामात जमा करण्यात येतात.हे काम सोपे व्हावे, म्हणून मुंबई महापालिकेने आता गुगली मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेवारस वाहन रस्त्यावर दिसल्यास त्या गाडीवर नोटीस चिकटवण्यात येत आहे. या कार्यवाहीनंतर महिन्याभरात वाहन मालकाने प्रतिसाद न दिल्यास त्या गाडीचा रितसर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाकाळात ठप्प झालेली बेवारस गाड्यांवरील कारवाई महापालिकेने काही दिवसांपासून मोठ्या जोमाने सुरू केली आहे. वाहने उचलून नेण्याबाबतची कारवाई वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच पालिका प्रशासनाकडे सोपविण्यासाठी पोलिसांकडे असलेली टोइंग वाहने पुन्हा पालिकेकडे आली आहेत. रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेल्या एकूण २ हजार ३८१ वाहनांच्या मालकांना पालिकेने काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यापैकी ३७९ जणांनी वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त केली. बेवारस वाहनांचा लिलाव करत पालिकेच्या तिजोरीत महसूल जमा करणे हा कारवाईचा उद्देश नसून रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, हे उद्दिष्ट असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!