Home » गोंदियातील विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

गोंदियातील विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

by Navswaraj
0 comment

गोंदिया : बिरसी विमानतळावरील पायलट प्रशिक्षणार्थी विमान टेकडीवर कोसळल्याने झालेल्या अपघातात एक महिला व पुरुष ट्रेनी पायलटचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोसमरा पंचायत अंतर्गत जंगलातील टेकडीवर घडली. प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाचे नाव रुपशांका वरसुका आणि प्रशिक्षकाचे नाव मोहित आहे. प्रशिक्षणार्थी रुपशांका बेपत्ता असल्याचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले. हेलकावे खात विमान आदळले असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी विमान अपघातग्रस्त ठिकाणी अचानक हेलकावे खाऊन टेकडीवर आदळले. त्यामुळे त्यातून ज्वाळा निघू लागल्या आणि काही सेकंदांतच विमान डोंगरावरून खाली कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागून विमानातील प्रशिक्षक मोहितचा जळून मृत्यू झाला. विमानाचे अवशेष १०० फूट खोल दरीत पडले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!