Home » पॉलिशची बतावणी करून सोने लंपास

पॉलिशची बतावणी करून सोने लंपास

by Navswaraj
0 comment

अकोला : जिजामाता नगर परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरी भेट देऊन घरातील ऐवज चकाकून देतो. म्हणून सांगत अंदाजे साडेतीन तोळ्याचे  ऐवज किंमत एक लाख ७५ हजार रुपयाचा लंपास केल्याची घटना ता.२९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरातील वयोवृद्ध सदस्य अंजनाबाई तरडेजा यांनी देखील लगेच विश्वास ठेवत गणपतीची पितळाची मूर्ती अज्ञात व्यक्तीकडे दिली. मूर्ती चकाकून दिल्यानंतर घरातील आणखी काही वस्तू असतील तर आम्हाला द्या त्या पण आम्ही चकाकून देतो म्हणत चोरट्यांनी इच्छा प्रकट केली.ऐवज चकाकून देतो यावर  विश्वास ठेवून वयोवृद्ध अंजनाबाई तरडेजा यांनी हातातील दोन सोन्याचे कडे आणि एक अंगठी, असे अंदाजे साडेतीन तोळे सोने अज्ञात व्यक्तीच्या हवाली केले. या नंतर एकाच भांड्यात हे दोन्ही ऐवज बुडवल्यानंतर अचानक पाण्याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यानंतर या व्यक्तीने गरम पाणी आणायला अंजनाबाई यांना सांगितले. पाणी आणायला जाणार तेवढ्यातच चोरट्याने क्षणाचाही विलंब न करता भांड्यातील ऐवज सोबत घेऊन पसार झाला. घरातून बाहेर पडताना निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला एक व्यक्ती. घराबाहेरच उभ्या असलेल्या आपल्या दुसऱ्या साथीदाराला सोबत घेत दोघेही लाल रंगांच्या दुचाकी वरून पळून जाताना सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. या घटनेनंतर तरडेजा कुटुंबियांकडून लगेचच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अकोट शहरचे नवनियुक्त ठाणेदार तपन कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!