Home » गरबा आयोजकांनी दक्षता घ्यावी : सनातन संस्कृती महासंघाचे आवाहन 

गरबा आयोजकांनी दक्षता घ्यावी : सनातन संस्कृती महासंघाचे आवाहन 

by Navswaraj
0 comment

अकोला : १५ ऑक्टोबर पासून नवरात्र प्रारंभ होत आहे. नवरात्री दरम्यान गरबाचे आयोजन करण्यात येते. महिला आणि तरूणी यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. गरबादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आयोजकांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. गरबाच्या ठिकाणी आयोजन करणाऱ्या मंडळाचे ओळखपत्र असलेले स्वयंसेवक असावेत, त्यांनी योग्य शहानीशा करूनच पुरूष व तरूणांना गरबा खेळणे अथवा बघण्यासाठी प्रवेश द्यावा. जेणेकरून असामाजिक तत्वांचा उपद्रव होणार नाही. गरबा नृत्याशी संबंधित गाणीच वाजविण्यात यावी. गरबा हा पारंपरिक नृत्याचा प्रकार आहे, फॅशन शो किंवा साधारण कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यात सहभाग घेणाऱ्यांची वेशभूषा त्याला साजेशी व योग्य असावी याची काळजी देखील आयोजकांनी घ्यावी.

काही ठिकाणी आयोजन समितीतर्फे पासचे वाटप करण्यात येते. पास वाटप करताना जबाबदारीने करावे, पास योग्य व्यक्तींनाच देण्यात यावेत. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था असावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत अथवा रेकाॅर्डींगची सोय करावी. जेणेकरून गरबाचे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही.

गरबामध्ये सहभागी होणाऱ्या महिला तसेच तरूणींच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी सर्व लहान- मोठ्या गरबा आयोजकांनी घ्यावी, आवश्यकता भासल्यास पोलिसांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन सनातन संस्कृती महासंघातर्फे करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!