Home » अमरावती कारागृहात मोबाईल पाठोपाठ आढळला गांजा

अमरावती कारागृहात मोबाईल पाठोपाठ आढळला गांजा

by Navswaraj
0 comment

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पाठोपाठ आता गांजाही आढळून आला आहे. भिंतीवरून चेंडुच्या मदतीने गांजा व नागपुरी खर्रा पुरवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहातील जनरल सुभेदार प्रल्हाद लक्ष्मण इंगळे हे कारागृहात गस्त घालत असताना त्यांना भिंतीलगत निळ्या रंगाचा चेंडू दिसून आला. त्या चेंडूत त्यांना १९ ग्रॅम गांजा आणि दोन नागपुरी खर्ऱ्याच्या पुड्या आढळल्या.त्यांनी  तातडीने याबाबतची माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना दिली. कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कारागृहातील दोन कैद्यांजवळ बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मोबाईल आढळून आला होता. मोबाईल कुठून आला, याचा तपास पोलीस करीत असतानाच आता गांजा आढळून आला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!