Home » पाच वर्षांपेक्षा जुन्या गणेशोत्सव मंडळांना करावे लागेल परवानगीचे नूतनीकरण

पाच वर्षांपेक्षा जुन्या गणेशोत्सव मंडळांना करावे लागेल परवानगीचे नूतनीकरण

by Navswaraj
0 comment

अकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी परवानगीसाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच महावितरण कार्यालयात खेटे घालावे लागतात. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची नाराजी होती. हा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका प्रशासनाने १९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत दिलासादायक निर्णय घेतला आहे.

पाच वर्षांपेक्षा जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता दरवर्षी नव्याने परवानगी काढण्याची आवश्यकता नाही. आता मंडळांना फक्त मागील वर्षी देण्यात आलेल्या परवानगीचे नूतनीकरण करावे लागेल.

महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय कौतुकास्पद असला तरी परवानगी नूतनीकरण प्रक्रिया सोपी असावी असे मंडळ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!