Home » पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात बाप्पाला अकोल्यात निरोप 

पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात बाप्पाला अकोल्यात निरोप 

by Navswaraj
0 comment

अकोला : १३० वर्षांची परंपरा असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला गुरूवार सकाळी ११ वाजता जयहिंद चौकातून सुरूवात झाली. जयहिंद चौक तसेच वीर हनुमान चौकात गणेशोत्सव मंडळांतर्फे मानाच्या श्री बाराभाई गणपतीचे पूजन करण्यात आले.

मिरवणुकीत ४० वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच व्यायाम शाळा सहभागी झाल्यात. अतिशय संथगतीने मिरवणुकीचे मार्गक्रमण सुरू होते. मानाच्या गणपतीचे विसर्जन नियमित वेळेवर झाले. मिरवणुकीत सहभागी असलेले शेवटचे मंडळ रात्री ०८. ४५ वाजता अगरवेस जवळ होते. भव्य गणेशमूर्ती असलेली मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली असली तरी अनेक जुन्या मंडळांनी सरळ वाघोली तसेच बाळापूर येथे जाऊन गणेश विसर्जन केले.

error: Content is protected !!