Home » ‘श्रीं’ची पालखी शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ

‘श्रीं’ची पालखी शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ

by नवस्वराज
0 comment

शेगाव : कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिरामधून संत श्री गजानन महाराजांची पालखी सोमवार, ६ जून २०२२ रोजी सकाळी मार्गस्थ झाली.

विठ्ठल रुक्माईच्या गजरात भजनी, दिंडी, अश्व, हत्ती आणि ७०० वारकऱ्यांसह पायदळ वारी निघाली आहे. मंदिरात पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर मंदिराला ही पालखी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे रवाना झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने या पालखीचे १९६८ पासून आयोजन करण्यात येत आहे.

शेगावातून सोमवारी निघालेल्या पालखीची मंदिराच्या विश्वस्तांनी पूजा केली. पहाटे आरती आटोपून पालखी पंढरपूर करीता रवाना झाली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथे पालखीचा मुक्काम असेल . गेल्या चार दशकापासून गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्यावतीने अकोल्यात पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते. कोरोनाच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर पालखी अकोल्यात येणार असल्याने यंदा संत गजानन महाराजांच्या भक्तांमधील उत्साह द्विगुणीत दिसत आहे.

error: Content is protected !!