Home » गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, तीन जहाल नक्षलींना केली अटक

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, तीन जहाल नक्षलींना केली अटक

by Navswaraj
0 comment

गडचिरोली : भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी शोध अभियान राबवताना तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर दहा लाख रुपयांचे बक्षीस आहे. सी सिक्सटी आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे रामेश पल्लो वय 29, तानी उर्फ ​​शशीचमरुपुंगती वय 23 आणि अर्जुन ऊर्फ महेश रैनू नरोटे वय 27 आहे.

रमेश पल्लो दलममध्ये 2019 मध्ये भरती झाल्यानंतर कंपनी दहाचा सदस्य आणि स्काऊट टीम सदस्य म्हणून काम केले. 2021-22 मध्ये तो स्काउट टीम सदस्य म्हणून काम करत होता. त्याचा तीन खून, आठ चकमक, एक जाळपोळ, एक इतर अशा एकूण 13 गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

तानी उर्फ ​​शशीचमरुपुंगती 2015 मध्ये ती नक्षलवाद्यांमध्ये सामिल झाली. 2016 ते 2019 पर्यंत ती प्लाटून क्रमांक सातमध्ये सदस्य होती. 2019 पासून आतापर्यंत ती कंपनी क्रमांक दहामध्ये सदस्य म्हणून काम करीत होती. तिचा चार खून आणि तीन चकमकी अशा एकूण सात गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.

अर्जुन उर्फ ​​महेश रैनू नरोटेची पेरमिली दलममध्ये 2010 मध्ये सदस्य म्हणून भरती. 2013 पासून त्याने प्लाटून क्रमांक 14 मध्ये देखील काम केले. त्याची बदली सिरोंचा दलम येथे झाली. ऑगस्ट 2013 आणि 2018 पर्यंत सदस्य म्हणून काम केले. मे 2018 पासून भामरागड दलममध्ये तो कार्यरत होता. सात खून, नऊ चकमकी, दोन जाळपोळ, दोन चोरी, एक दरोडा आणि तीन इतर अशा एकूण 24 गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. महाराष्ट्र सरकारने रमेश पल्लोवर 4 लाख रुपये, तानीवर 4 लाख,  अर्जुनवर 2 लाख बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या प्रभावी नक्षलवाद विरोधी मोहिमेमुळे 2021-22 या दोन वर्षात आतापर्यंत एकूण 57 कट्टर नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि डीआयजी सीआरपीएफ जे. एन. मिना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक (ऑपेरेशन) सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!