Home » १८ वर्ष व त्यावरिल पुरूषांची मोफत आरोग्य तपासणी होणार

१८ वर्ष व त्यावरिल पुरूषांची मोफत आरोग्य तपासणी होणार

by नवस्वराज
0 comment

अकोला : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सर्व आरोग्य संस्था स्तरावर दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील वय वर्षे १८ व त्यावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वय वर्षे १८ व त्यावरील सर्व पुरूषांची संख्या १/३ (एक तृतीयंश) अंदाजित असल्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती खूप मोठी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रूग्णालयांच्या माध्यमातून या वयोगटातील व्यक्तींना विविध सेवा देण्यात येतात. या मोहिमेच्या माध्यमातून विभागांतर्गत १८ वर्षांवरील पुरूषांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक करावयाच्या चांचण्या, उपचार इत्यादी मोफत मिळवून देणे हा या आरोग्य तपासणी मोहीमेचा मुख्य उद्देश आहे.

‘आयुषमान भव’, या योजनेचे अनावरण मा राष्ट्रपती भारत सरकार यांचे हस्ते १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर या मोहिमेची घोषणा व शुभारंभ जिल्हास्तरीय कार्यक्रमातून करण्यात येईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!