Home » बुलडाणा, अमरावतीचे माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा नेते पदाचा राजीनामा

बुलडाणा, अमरावतीचे माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा नेते पदाचा राजीनामा

by Navswaraj
0 comment

अमरावती : शिवसेनेच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात विचारपूसही न केल्याची खंत अडसूळ यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहेत. आता अडसूळ यांनीही राजीनामा दिला आहे. मात्र अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. बुलडाण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेनेत नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शिवसेनेत सध्या नऊ जण हे नेतेपदावर आहेत. दरम्यान, अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठे नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नाराजीने अमरावतीमधील शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ हे देखील शिवसेनेचे आमदार होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!