Home » अकोल्यात हरीदास भदेंच्या हातावर शिवबंधन

अकोल्यात हरीदास भदेंच्या हातावर शिवबंधन

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला पूर्व मतदार संघामध्ये भारिप बहुजन व सध्याची वंचित बहुजन आघाडी मध्ये दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार हरीदास भदे यांनी हातावर शिवबंधन बांधले आहे. रविवार, ३ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतील मातोश्री येथे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.

दोन वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले होते. परंतु अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीची विभागणी झाली. ही विभागणी बघता ईतर कुठल्या पक्षात न जाता भदे थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत दाखल झाले आहेत. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर भदे यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीही सहभागी झाली आहे. त्यामुळे वंचितने अकोल्यातील जागेवर दावा केल्यास माजी आमदार हरिदास भदे यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!