Home » राजीनामा दिला, त्याला मी काय करू : कोश्यारी

राजीनामा दिला, त्याला मी काय करू : कोश्यारी

by नवस्वराज
0 comment

मुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला असताना प्रकरण न्यायप्रतिष्ठ असल्याचे कारण देत प्रतिक्रिया देण्यापासून वाचणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निकालानंतर आपली भूमिका योग्य होती असा बचाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढल्यानंतर कोश्यारी यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘कुणी माझ्याकडे स्वेच्छेने राजीनामा घेऊन आले असेल तर त्याला मी काय करणार? राजीनामा देऊ नका असे म्हणणार का?’ असा प्रतिप्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केला आहे. राज्यघटनेच्या नियमांच्या आधारे आपण त्यावेळी निर्णय घेतल्याचे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. कोणतीही घाई न करता आपण निर्णय घेतले. तज्ज्ञ व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे सर्व निर्णय विचारपूर्वक होते, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. आपण राज्यपाल पद सोडून आता सुमारे तीन महिने होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. त्यावर विचारमंथन करणे कायदेतज्ज्ञांचे काम आहे. आपण घटनेच्या आधारे निर्णय घेतले असे ते म्हणाले. आपल्याला केवळ संसदीय कार्यशैली माहिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जास्त बोलणे चुकीचे ठरेल असे कोश्यारी म्हणाले.

‘राज्यपालाची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. मी त्यावर जाहीरपणे आधीच बोललो आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात राहील’, अशी प्रतिक्रीया देत शरद पवारांनी राज्यपालांची नियुक्ती, राज्यपालांचे वर्तन आणि त्यांची सत्ताधाऱ्यांना असलेली साथ याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि कोश्यारींवर टीका केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!