Home » चंद्रपुरात वर्धा नदीला महापूर; हजारो नागरिक विस्थापित

चंद्रपुरात वर्धा नदीला महापूर; हजारो नागरिक विस्थापित

by Navswaraj
0 comment

चंद्रपूर : वर्धा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे गडचिरोलीनंतर आता चंद्रपूर जिल्हा पुराच्या विळख्यात अडकला आहे. जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत. यवतमाळ – चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा पूल जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

वर्धा, वैनगंगा, उमा, इरई नदीला आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला आहे. अनेक गावांना पुराने वेढा दिला. दोन हजारचा आसपास नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. इरई, अप्पर वर्धा, बगोसे खुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. माजरी, बेलसनी गावात पुराचे पाणी शिरले त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले आहे.

पावसामुळे आधीच नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा, मूल तालुक्यातील ताडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आला. पुरात अडकलेल्या, शेतातील बांद्यावर अडकून असलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर-वणी मार्ग बंद झाला आहे. बामणी येथील वर्धा नदीचा पुलावरून पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा- हैदराबाद मार्ग बंद आहे. महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पूल पाण्याखाली आला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!