Home » सहा किलोमीटर घुमतो अमरावतीच्या धामंत्रीतील घंटेचा ध्वनी

सहा किलोमीटर घुमतो अमरावतीच्या धामंत्रीतील घंटेचा ध्वनी

by Navswaraj
0 comment

अमरावती : तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्री येथील पौराणिक नागेश्वर महादेव मंदिरातील महाकाय घंटा अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सुमारे ४१० किलोच्या या घंटेचा ध्वनी परिसरातील सहा किलोमीटरपर्यंत घुमतो. वर्धा नदीच्या काठावर धामंत्रीचे हे नागेश्वर महादेव मंदिर आहे. आता या मंदिरातील शिवलिंगाला ९४ किलोची अष्टधातू पिंड बसविण्यात आली आहे.

धामंत्री मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे नागेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिर एका अखंड दगडात कोरलेले आहे. मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे असावे असे सांगण्यात येते. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर एका भाविकाने या मंदिराला घंटा दान दिली होती. मंदिरासमोर आणखी एक मंदिर बाधून त्यात घंटा टांगलेली आहे. तिवसावरून या मंदिराचे अंतर १४ किलोमीटर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि इथे कालसर्पाची पूजाही केली जाते. पेशव्यांच्या काळात १६०७ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला, असे सांगितले जाते. राज्यातील हे ‘क’ वर्ग तीर्थस्थळ आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!