Home » सिंदखेडराजा जवळ अपघात पाच ठार, १३ जण जखमी

सिंदखेडराजा जवळ अपघात पाच ठार, १३ जण जखमी

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी झालेत. मुंबई-संभाजीनगर-औरंगाबाद महामार्गावर सिंदखेडराजा जवळ असलेल्या पळसखेड चमकत येथे हा भीषण अपघात घडला. घटनेत बसच्या चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सिंदखेडराजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची बस छत्रपती संभाजीनगर येथुन वाशीमकडै जात होती. सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. घटनेत बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंदेखेडराजा पोलिसांनी अपघातस्थळ गाठले. पळसखेडच्या ग्रामस्थांनीही अपघातस्थळी बचाव कार्य सुरू केले. या अपघातामुळे मुंबई- छत्रपती संभाजीनगर- नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताता १३ जण जखमी झाल्याचे सिंदखेडराजा पोलिसांनी सांगितले. त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोमवारी शेगावजवळ क्रुझर वाहनाच्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला होता. सात जण या अपघातात जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी हा अपघात घडला आहे. दरम्यान मंगळवारी घडलेल्या अपघातातील मृतक आणि जखमींची नावे अद्याप कळु शकली नाही. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सिंदखेडराजा पोलिसांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!