Home » अकोल्यातील भंगाराच्या दुकानात अग्नितांडव

अकोल्यातील भंगाराच्या दुकानात अग्नितांडव

by Navswaraj
0 comment

अकोला : फतेह चौक ते दीपक चौकादरम्यान शास्त्री स्टेडियमला लागून असलेल्या अमन स्क्रॅपसह सात ते आठ दुकानांमध्ये शुक्रवारी सकाळी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाला २० तासांपेक्षा अधिक काळ झुंज द्यावी लागली. आग विझविण्यासाठी २५ बंबांचा वापर करण्यात आला. पहाटे ५.३० वाजत भंगार दुकानांमधुन धुराचे लोट निघू लागल्याने परिसरात असलेल्या नागरिकांना दिसले. बाजूलाच फटाका बाजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. भंगारातील प्लॉस्टिकने आग पकडली असल्याने अग्निशमन दलास बरेच प्रयत्न करावे लागले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे २५ बंब लागले.

गांधी रोडमार्गे फतेह चौकापर्यंत पोहोचता येते. मात्र दिवाळीसाठीच्या बाजारातील दुकाने खुले नाट्यगृह ते फतेह चौकापर्यंत रस्त्यावरच थाटण्यात आली आहेत. गांधी चौकातही दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या मार्गावरून बंब आग विझविण्यासाठी पाठविता आले नाही. बंब टिळक रोडवरून अकोट स्टँडमार्गे घटनास्थळापर्यंत लांबच्या रस्त्याने पाठवावे लागले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विलंब झाला. भंगाराच्या दुकानांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आग लागते. त्यामुळे ही भंगाराची दुकाने वस्तीपासून लांब नेण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!