Home » अकोल्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अकोल्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला जिल्ह्यातील एकूण ५४ ग्रामपंचायतींसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी १४ ग्रामपंचायतीमधील  निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ४० अशा एकूण ५४ ग्रामपंचायतींमधील निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित व सन् २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतींमधील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, तसेच संबंधित कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कधीही या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्या येऊ शकतो.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!