Home » दोन खासगी ट्रॅव्हल्सना भीषण अपघात; सहा ठार

दोन खासगी ट्रॅव्हल्सना भीषण अपघात; सहा ठार

by Navswaraj
0 comment

बुलढाणा : दोन खाजगी लक्झरी बसच्या झालेल्या अपघातामध्ये सहा प्रवासी ठार झालेत. बुलढाणा जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. देवदर्शनावरून परत येत असलेल्या भाविकांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास झाला.

अमरनाथ तीर्थयात्रा करून एम. एच. ०८, ९४५८ ही खासगी बस हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये जवळपास ४० भाविक होते. तर दुसरीकडे एम. एच. २७ बी. एक्स. ४४६६ ही बस नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात होती. मात्र मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर येताच या दोन्ही बसेसची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी जालेल्या सहा प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. तर अन्य जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!