Home » अकोल्यात उड्डाणपुलावर भीषण अपघात; एक ठार

अकोल्यात उड्डाणपुलावर भीषण अपघात; एक ठार

by Navswaraj
0 comment

अकोला : उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अशोक वाटिकाजवळ दुचाकी आणि कार वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. हाती आलेल्या वृत्तानुसार या घटनेत एका तरुणीचा वेदनायी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुचाकीस्वार तरुणी मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घराकडे येत होती. मात्र नियतीने येथेच तिच्यावर घाला घातला. नेहा सचवानी (22 वर्ष) असे या मृतक तरुणीचे नाव असून सिंधी कॅम्प येथील रहिवासी असल्याचे कळते. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. हा अपघात एवढा भीषण होता की, मृतकाचे शरीर धडापासून वेगळे झाले. सिटी कोतवाली, खदान पोलीस सिव्हिल लाईन आणि वाहतूक शाखेचे ठाणेदार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. पुढील तपास सिटी कोतवाली व सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत. दरम्यान कार आणि कारचालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!