Home » नागपूर, अकोल्यासह देशभरात पठानसाठी पोस्टरबाजी

नागपूर, अकोल्यासह देशभरात पठानसाठी पोस्टरबाजी

by Navswaraj
0 comment

अकोला : शाहरुख खानचा चित्रपट पठान वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना नागपूर, अकोल्यासह देशभरातील १० हजार ठिकाणी पठानला पाठिंबा दर्शविण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी फॅन क्लबच्या माध्यमातून पठानची पोस्टर केली आहे.

अकोल्यातील रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी पठानचे पोस्टर्स चिटकविण्यात आले आहे. शाहरुख खानच्या फॅन्सने तयार केलेल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून देशभरातील हे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे शाहरूख खानच्या चाहत्यांचे हे ‘फॅनपेज’ सोशल मीडियावर ‘व्हेरीफाईड’ही आहे.

पठान चित्रपटातील ‘बेशरम रंग..’ या गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अशात अनेकांनी शाहरुख खानलाही लक्ष्य केले आहे. चित्रपटाला विरोध होत असतानाच शाहरुखच्या फॅन्सने देशभरात एकाच वेळी पोस्टर लावले आहे. नागपूर, अकोल्यातही हे पोस्टर लावत चाहत्यांनी प्रेक्षकांना ‘पठान’ चित्रपट बघण्यासाठी सिनेमाघराकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!