Home » अकोला- तिरूपती- अकोला विशेष रेल्वेला मुदतवाढ

अकोला- तिरूपती- अकोला विशेष रेल्वेला मुदतवाढ

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला-वाशिम-पूर्णा मार्गावरुन धावणाऱ्या अकोला- तिरुपती- अकोला विशेष एक्स्प्रेसला आणखी महिनाभर मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. सणासुदीच्या काळात तिरुपतीला जाण्यासाठी प्रवाशांची सोय होईल. प्रवाश्यांची गर्दी आणि प्रतिसाद लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेकडून मुदत संपलेल्या रेल्वेगाड्यांना  मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार २५ ऑगस्टपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती- अकोला विशेष एक्स्प्रेस १ ते २९ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. रेल्वे प्रस्थान स्थानकावरुन अर्थात तिरुपतीवरुन दर शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता निघेल दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजता अकोला येथे पोचेल.

२६ ऑगस्टपर्यंत नियोजित वेळेनुसार धावणारी गाडी क्रमांक ०७६०६ अकोला- तिरुपती विशेष एक्स्प्रेसला ३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाली असून ही गाडी दर शनिवारी अकोला स्थानकावरुन सकाळी ८:१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी तिरुपती स्थानकावर सकाळी ६:२५ वाजता पोहचेल.

दक्षिण मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवासीवर्ग आनंदला असला तरी, अकोला- तिरुपती- अकोला एक्स्प्रेसला विशेष रेल्वेचा दर्जा असल्याने तिकीटाचे दर अधिक असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. या रेल्वेगाडीच विशेष दर्जा काढून रेल्वे नियमित सोडावी, अशी प्रवाश्यांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!