Home » प्रा.अतुला पटवर्धन यांनी व्यक्तीरेखा चित्रांतून साकारली ‘साहित्यिकांची मांदियाळी’

प्रा.अतुला पटवर्धन यांनी व्यक्तीरेखा चित्रांतून साकारली ‘साहित्यिकांची मांदियाळी’

by नवस्वराज
0 comment

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या चित्रशाळा कलादालनात प्रा. अतुला पटवर्धन यांनी व्यक्तिरेखा चित्रांतून साकारलेल्या ‘साहित्यिकांची मांदियाळी’ ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे माजी प्रमूख विनोद इंदुरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी साहित्यिक प्रकाश ऐदलाबादकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आभाराणी पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यात प्रमोद कळमकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अतुला पटवर्धन नागपुरातील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे मागील २६ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. केवळ साहित्यिकांचीच व्यक्तिरेखा चित्रे याप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा.पटवर्धन म्हणाल्या की, सगळ्याच साहित्यिकांनी आपली मराठी भाषा समृद्ध केली आहे. त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने हे प्रदर्शन लावण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. मराठी हळूहळू हद्दपार व्हायला लागली आहे, हे एकंच वैषम्य आहे. तेंव्हा या प्रदर्शनातून साहित्यिकांची ओळख करून द्यावी आणि मराठी विषयाकडे, वाचनाकडे माणसे वळावित, असा थोडा जरी परिणाम साधता आला तरी प्रदर्शनाचा उद्देश साध्य होईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!