Home » शिव मंदिरातील कीर्तीमुखाची काय आहे अस्सल कथा

शिव मंदिरातील कीर्तीमुखाची काय आहे अस्सल कथा

by Navswaraj
0 comment

नागपूर : आपल्याला  मंदिरात गेल्यावर मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसत. या शिल्पाच नाव काय असेल, का असते हे शिल्प असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर चला तर जाणून घेऊया.

या शिल्पाला “कीर्तीमुख” असे म्हणतात. हे कीर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक पौराणिक कथा आहे. जालंधर नावाचा एक राक्षस होता. तो शंकराचा मोठा भक्त होता. त्याला प्रचंड भूक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भूक कधी शमायची नाही. त्याने घोर तपश्चर्या केली. कालांतराने महादेव त्याला प्रसन्न झाले. महादेवाने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असुराने भुकेपासून मुक्ती मिळावी ही प्रार्थना केली. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केले, तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगितले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा व ती नष्ट कर. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या कीर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. अशी मान्यता आहे की हे कीर्तीमुख मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची पापे खाते. पापांची कमतरता नाही त्यामुळे या राक्षसाची भूक कायम भागत राहते.

error: Content is protected !!