Home » अकोला रेल्वे स्थानकावर कार्यान्वित झाला स्वयंचलित जीना

अकोला रेल्वे स्थानकावर कार्यान्वित झाला स्वयंचलित जीना

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्यातील रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिन्याचे लोकर्पण करण्यात आले. सामाजिक दायित्व लक्षात घेत जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे रेल्वे प्रवाशांच्या समस्या निराकरणासाठी कटीबद्ध असणे यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पाठपुरावा करून अकोला रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा गेल्या दोन वर्षांत बदलला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार बसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर विजय अग्रवाल, वसंत बाछुका, विजय मालोकार, किशोर पाटील, अर्चना मसने, माजी महापौर सुमन गावंडे, राहुल देशमुख, गिरीश जोशी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार संजय धोत्रे सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव मानकर यांनी केले. आभार  प्रदर्शन गिरीश जोशी यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!