Home » खड्ड्यात गेले अख्ख्या अकोल्यातील अनेक रस्ते

खड्ड्यात गेले अख्ख्या अकोल्यातील अनेक रस्ते

by Navswaraj
0 comment

अकोला : योग्य देखभाल व दुरूस्ती अभावी अकोल्यातील निम्म्यावर रस्ते खड्ड‌्यात गेले आहेत. नेत अंतर्गत राजकारणात व्यस्त असल्याने अकोल्याची ओळख पुन्हा एकदा खड्डे व धुळीचे शहर म्हणून झाली आहे.

विदर्भाच्या विकासाचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात लवकरच आंतरराष्ट्रीयस्तराची जी-20 परिषद होणार आहे. त्यामुळे नागपुरातील रस्ते चकाचक करण्याचे काम सुरू आहे. मात्र अर्थसंकल्पात भोपळा मिळालेल्या अकोल्यातील रस्त्यांकडे व येथील समस्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. अकोला महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोल्यातील रस्त्यांवर २० हजारांवर लहान मोठे खड्डे आहेत. अशात अनेक खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

अकोल्यातील मुख्य पोस्ट ऑफिस समोरील सिव्हिल लाईन्सकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील नाला खचून खड्डा पडला आहे. या मार्गावर सकाळ पासून उशिरा रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. महानगरातील दोन महाविद्यालयदेखील याच रस्त्यावर आहेत. लोकांना सावध करण्याच्या दृष्टीने नागरीकांनी धोक्याची सूचना देणारे लाल निशाण लावले आले आहे. परंतु प्रशासनातर्फे दुरूस्तीचा मुहूर्त काढण्यात आलेला नाही. हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशा अनेक खड्ड्यांकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे व अकोल्यातील नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!