Home » गुरव समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे प्रबोधन

गुरव समाज महिला मंडळाच्या कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे प्रबोधन

by Navswaraj
0 comment

अकोला : गुरव समाज महिला मंडळाची मासिक बैठक जुनेशहरातील श्री जागेश्वरीदेवी संस्थानच्या सभागृहात १६ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली. बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाचे पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंचावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे हेमंत जकाते जिल्हा संघटनमंत्री, दिनेश पांडे अध्यक्ष, मनोहर गंगाखेडकर मार्गदर्शक, तसेच महिला मंडळाच्या मीनाक्षी पवार, प्राजक्ता सपकाळ होत्या. अमोल पवार आणि अंकुश बाळापूरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन तसेच गुरव समाजाचे आराध्य परमहंस परशराम महाराज यांचे प्रतिमा पुजनाने झाली. त्यानंतर हेमंत जकाते यांचे विभाताई जऊळकार यांनी, दिनेश पांडे यांचे मीनाक्षी पवार, तर मनोहर गंगाखेडकर यांचे लिना पातूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समाजाचे कार्य धडाडीने करत असल्याबद्दल मीनाक्षी पवार यांचा कांचन गुरव, तसेच प्राजक्ता सपकाळ यांचा रूपाली तायडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

दिनेश पांडे यांनी, उपस्थित महिलांना परशराम महाराज यांच्या काही गोष्टी सांगितल्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत १९७४ पासून ग्राहक जागृती आणि सक्षमीकरणाचे कार्य निस्वार्थपणे करत असल्याचे सांगून, कार्यपद्धतीची विस्ताराने माहिती देऊन, ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निरसन केल्याचे सांगितले. महीलांना ऑनलाईन वार्षिक शुल्क भरून ग्राहक पंचायतचे सदस्य व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेमंत जकाते यांनी महिलांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. ग्राहकांचे अधिकार त्यांचे कर्तव्य, पक्क्या बीलाचे महत्त्व सांगून वाॅरंटी, ग्यारेंटी बाबत अवगत केले. घरगुती गॅस सिलिंडर, आय एस आय, एगमार्क, एफ एस एस ए आय, हाॅलमार्क तसेच खाद्यपदार्थ, टूथपेस्ट आदीवर असलेल्या विविध चिन्हांची प्रात्यक्षिका द्वारा सविस्तर माहिती दिली. कुठलीही वस्तू, खाद्यपदार्थ आदी खरेदी करतांना योग्य ती दक्षता घेण्यात यावी, भ्रामक जाहिरातींना बळी पडू नये, असे मनोहर गंगाखेडकर म्हणाले. महीला जास्त खरेदी करतात, त्यामुळे त्यांनी जागृत व सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा जऊळकर, सुनिता वाघमारे, रिद्धी अंबुलकर, सिद्धी अंबुलकर, शुभांगी विटकरे, रश्मी तायडे, शुभांगी विटकरे, शामला पिंपळकर, विभा जऊळकर, लिना पातूरकर, नंदा गुरव, सीमा पेटकर, रोहिणी रामदेवकर, कांचन गुरव, अर्चना दाणेकर, रुपाली दाणेकर, रेखा पातूरकर, ज्योती जांभेकर, अपर्णा वानखडे, नयना जांभेकर, गायत्री गुरव, मयुरी नाचणकर, अनिता केंदरकर, प्रियंका बेलबाबकर, उन्नती नागपूरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता सपकाळ यांनी, तर आभार प्रदर्शन मीनाक्षी पवार यांनी केले.

परशराम महाराज सहासष्टीच्या वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. असे अ.भा. ग्राहक पंचायतचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!