Home » पाकिस्तान पेक्षा इंग्लडचा राग यायल हवा : आमदार बच्चू कडू

पाकिस्तान पेक्षा इंग्लडचा राग यायल हवा : आमदार बच्चू कडू

by Navswaraj
0 comment

अमरावती : आम्हाला पाकिस्तान म्हटलं तर त्याचा जास्त राग येतो. तो आलाही पाहिजे, परंतु त्यापेक्षा जास्त राग हा इंग्लंडचा यायला हवा. ‘सोने की चिडीया’ असलेल्या भारताला त्यांनी लुटून नेले.

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं आमच्या संताची ग्रंथ संपदा तसेच आम्हाला प्रेरणा देणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी येथून लुटून नेल्या. त्यामुळे आता इंग्लडला लुटण्याची वेळ आल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे ‘मेरा देश, मेरा खून’ ही मोहीम मुंबईतून सुरू केली आहे. याच मोहिमेचा दुसरा टप्पा आयोध्येतून सुरू होत असून, अयोध्या दौऱ्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या चरणी ऊस, कापूस, सोयाबीन, धान, प्रसाद म्हणून चढवून राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भारतातील आर्थिक संपत्ती बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं आमच्या संताची ग्रंथ संपदा देखील लुटून नेल्या. त्यामुळे पाकिस्तान पेक्षा जास्त राग हा इंग्लडचा यायला पाहिजे. आता इंग्लडला लुटण्याची वेळ आल्याचेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!