Home » अकोल्यात 13 मार्चपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम

अकोल्यात 13 मार्चपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम

by नवस्वराज
0 comment

अकोला : महापालिका क्षेत्रातील मुख्य मार्गावर‎ पुढील आठवड्यात साेमवार १३‎ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम‎ राबवली जाणार आहे.

शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर 2022 पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. पुन्हा 13 मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केली आहे.

अकोला शहरातील सिंधी कॅम्प, कौलखेड, खदान, अशोक वाटिका, सिव्हिल लाईन्स, बस स्थानक, रतनलाल प्लॉट, जठारपेट, रेल्वे स्थानक, अकोट फैल, माणिक टॉकीज, कापड बाजार, मोहम्मद अली रोड, जुने शहर, जय हिंद चौक, राजेश्वर मंदिर रोड, पोळा चौक, डाबकी रोड या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.

error: Content is protected !!