Home » अपंगांसाठी राखी निर्मितीतून रोजगार उभारणी

अपंगांसाठी राखी निर्मितीतून रोजगार उभारणी

by Navswaraj
0 comment

अकोला : दिव्यांगांसाठी रोजगार निर्मितीचा विशेष उपक्रम दिव्यांग सोशल फाउंडेशन व दिव्यज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविला. या माध्यमातून दिव्यांगांना स्वबळावर उत्पन्न प्राप्त होणार आहे.

प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. दिव्यांगांना शिक्षणासोबत रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत दिव्यांगांकडून विविध आकर्षक राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या राख्या दिव्यांग सोशल फाउंडेशनच्यावतीने शहरातील विविध शाळा, महाविद्यालय व बाजारपेठेत दालने लावून विकल्या जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या भारताच्या विविध शहरात पाठवल्या जात आहेत. विदेशातून सुद्धा राख्यांना चांगली मागणी येत आहे. या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!