Home » राज्यभरातील महावितरण कर्मचारी तीन दिवस संपावर

राज्यभरातील महावितरण कर्मचारी तीन दिवस संपावर

by Navswaraj
0 comment

अकोला : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी  सलग तीन दिवसांच्या संपावर आहेत.  खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 3 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री पासून संपावर आहेत. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. महावितरणचेही खासगीकरण केले जाणार आहे. सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. संपात राज्यातील 30 प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत.

error: Content is protected !!