Home » Mumbai News : रेसाॅर्ट व फार्महाऊसमध्ये एक कोटीवर वीज चोरी 

Mumbai News : रेसाॅर्ट व फार्महाऊसमध्ये एक कोटीवर वीज चोरी 

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : अडाणी इलेक्ट्रिक कंपनीचा वीज पुरवठा असलेल्या मानोरी- मारवे मार्गावरील रेसाॅर्ट तसेच फार्महाऊसचे मोठे वीज चोरी प्रकरण उघडकीस आले आहे. मीटर वाचन संशयास्पद वाटल्यामुळे अदानी इलेक्ट्रिक कंपनीच्या वीज सुरक्षा पथकाने एका रेसाॅर्टवर अचानकपणे धाड टाकली असता तपासणी केल्यावर रेसाॅर्ट व परिसरातील बंगल्यात वीजचोरी होत असल्याचे सिद्ध झाले. 5 लाख 41 हजार युनिटच्या वीजचोरीची रक्कम 1.04 कोटी रूपये आहे. (Electricity Theft Detected By Adani Electricity Vigilance Team Amountig To 1.04 Crore Rupees At Manori-Marve Road Mumbai)

वीज अधिनियमाच्या कलम 135 अन्वये कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदानी वीज कंपनीच्या वीज सुरक्षा पथकाने केलेल्या कारवाईत जुन महिन्यापासून 1 कोटी वरील वीजचोरी पकडल्याचे हे तिसरे प्रकरण असल्याचे अदानी कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. वीज चोरीमुळे प्रामाणिक वीज ग्राहक आर्थिक दृष्ट्या भरडला जाऊ नये म्हणून मानोरी, गोराई व मिराभाईंदर भागातील रेसाॅर्ट, हाॅटेल आणि व्यवसायिक वीज ग्राहकांची तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे तसेच वीज गळतीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!