Home » अकोल्यात ग्राहकांना कल्पना न देताच बदलले तक्रार निवारण केंद्र

अकोल्यात ग्राहकांना कल्पना न देताच बदलले तक्रार निवारण केंद्र

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यात महावितरणने ग्राहकांना कोणताही पूर्वसूचना किंवा कल्पना न देताच त्यांचे तक्रार निवारण केंद्र परस्पर बदलण्यात आले. अचानक झालेल्या या बदलांमुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला महानगरपालिकेची हद्द वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अकोला महानगरा लगतची काही गावे आता महानगरपालिका कार्यक्षेत्रात आली आहेत. पूर्वी ग्रामीण विभागाअंतर्गत असलेले अनेक वीज ग्राहक आता शहर विभागात समाविष्ट झाले आहेत. शहर विभागात एकूण १३ तक्रार निवारण केंद्र आहेत. सहाय्यक अभियंता हा तक्रार निवारण केंद्रप्रमुख असतो.

कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे ग्रामीण विभागातील ग्राहकांना, शहर विभागात समाविष्ट करून घेताना कुठल्याही तक्रार निवारण केंद्रावर ग्राहकांचा आणि कामाचा अतिरिक्त ताण वाढू नये यादृष्टीने ग्राहकांची विभागणी करण्यात आली. ग्राहकांचा व कामाचा समतोल कायम रहावा या दृष्टीकोनातून महावितरण कंपनी प्रशासनाने काही वीज ग्राहकांना पूर्वीच्या तक्रार निवारण केंद्रातून दुसऱ्या केंद्रात वर्ग केले. हा बदल रोहित्रनिहाय (फिडर) करण्यात आलेला आहे. महावितरण कंपनीतर्फे करण्यात आलेल्या बदलाची कोणतीही माहिती वीज ग्राहकांना देण्यात आली नाही. केंद्र बदलल्याची माहितीच नसल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांना त्रासाचा सामाना करावा लागत आहे.

वास्तविकतेत महावितरणने  या बदलांबाबत सविस्तर जाहीर सूचना द्यायला हवी होती. ही सूचना दिली असती तर ग्राहकांना होत असलेला त्रास वाचला असता. आता अनेक ग्राहकांना आपापले तक्रार निवारण केंद्र  शोधत फिरावे लागत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!